मैत्रीला कोणतीच परिभाषा नाही आणि परिसीमा ही नसते. अनोळखी कुणी कधी इतके जवळचे होऊन जाते की कळतही नाही
Posts
- Get link
- X
- Other Apps
तुला पाहता शब्द हवेत विरून जावे असं का ग व्हावे मी माझे न राहावे तू चालता वाऱ्याची झुळूक जणू यावी मी ही त्याच संगे का दरवळत जावे स्पर्श तुझा जणू मोरपिसाचा भास हा अन तू समोर येता का भरून जातो श्वास हा एकाच इच्छा, तुला कोणाचीही कधी नजर ना लागे जर तुटला कधी श्वास तुझा.. तर जोडीन मी माझा श्वास तुझा श्वासामागे.